पुस्तक वाचून धंदा करता येत नाही: राज ठाकरे

मुंबईत सोमवारी ‘मी उद्योजक होणार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे एकाच मंचावर उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, बाहेरच्या राज्यातील लोक महाराष्ट्रात का आले?, कारण इकडचं वातावरणच उद्योगधंद्यासाठी पोषक आहे. ओढूनताणून धंदा करता येत नाही. गुजराती माणूस हुशार आहे याबद्दल वाद नाही आणि हे आता कळतंच आहे. गुजराती माणूस त्याच्याकडे गुजराती माणूस कामाला ठेवत नाही. कारण तो गुजराती माणूस धंदा शिकेल आणि नवीन धंदा सुरु करेल अशी भीती त्यांना असते. आपण कधी तरी तिथे जाऊन शिकून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पुस्तक वाचून धंदा करता येत नाही हे लक्षात ठेवा. असे पुस्तक लिहिणारे का यशस्वी होत नाही. याऐवजी हावरेंसारख्या लोकांनी लिहिलेले पुस्तक वाचा. त्यांचा प्रवास या पुस्तकात आहे. इतर कोणत्याही समाजाचा माणूस हा पुस्तक वाचून धंदा करतो असे दिसले नाही, असे त्यांनी सांगितले. मराठी माणूस वडापाव विकतो असे सांगितले जाते. मात्र, तो धंदा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

More videos

See All