तर गुटखा माफिया हत्या करायला मागे-पुढे पाहणार नाहीत – धनंजय मुंडे

राज्यात गुटखा बंदी असली तरी खुलेआम गुटख्याची विक्री आणि उत्पादन सुरु आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. गुटखा बंदीच्या विषयावरुन आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मार्च महिन्यात विधानसभेच्या अधिवेशनात मी जेव्हा गुटखा बंदीचा संदर्भात प्रश्न उपस्थित केला तेव्हा माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धमक्या मिळाल्या. आता गुटख्याची गाडी सोडावी म्हणून पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत. राज्यात गुटखा बंदी असतानाही गुटख्याची गाडी सोडावी यासाठी पोलीस आणि अधिकाऱ्याला धमकावले जाते. याचा अर्थ राज्यात बंदी असतानाही खुलेआम गुटख्याची विक्री आणि उत्पादन सुरु आहे असे ते म्हणाले.

More videos

See All