शरद पवार-आशिष शेलार भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी संध्याकाळी अचानक भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएमधील राजकारण या भेटी मागे असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या शक्यता वर्तविण्यात येत आहेत. एमसीएची निवडणूक जून—जुलैमध्ये होण्याची शक्यता असून या निवडणुकीत शक्तिशाली बाळ महाडदळकर पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार कोण यावरही या भेटीत काही ठरले असण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत शरद पवार यांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांशी झालेल्या भेटीगाठी चर्चेत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. त्याआधी शेलार यांनी महिनाभरापूर्वी बारामतीला  पवारांची भेट घेतली होती. शेलार एमसीएचे अध्यक्ष असून लोढा समितीच्या शिफारसीनुसार त्यांना हे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. सध्या न्यायालयाने एमसीएवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे.

More videos

See All