राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसता तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते– नितीन गडकरी
Latest News
bookmarkBOOKMARK

राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसता तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते– नितीन गडकरी

By Lokmat calender  17-Aug-2019

राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसता तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते– नितीन गडकरी

माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या पुस्तकाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रकाशन करण्यात आले. ‘नो होल्ड्स बार्ड’ आणि ‘झंझावात’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशनादरम्यान नितीन गडकरी आणि शरद पवार उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नारायण राणेंवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. नारायण राणेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आमच्यात थोडीफार धुसफूस झाली. शिवसेना सोडू नका, असं मी राणेंना समजावलं होतं. त्यावेळी राणेंच्या डोळ्यातही अश्रू आले होते, तसेच मी हा निर्णय आनंदानं घेत नसल्याचं त्यांनी मला सांगितलं, याचीही आठवण नितीन गडकरींनी करून दिली. राणेंकडे चांगलं व्यवस्थापन कौशल्य होते. त्यावेळी नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसता तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते’, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. 

बाळासाहेबांचा स्वभाव परखड होता. पण बाळासाहेबांचंसुद्धा राणेंवर अपार प्रेम होतं. काळानुरूप राजकारणात अनेक बदल होत गेले असून, बदलत्या परिस्थितीनुसार राजकारण्यांना बदलावं लागलं. नारायण राणे कधी परिस्थितीसमोर हतबल झालेले नाहीत. महाराष्ट्र आणि मराठी माणसावर राणेंनी भरपूर प्रेम केले. 

MOLITICS SURVEY

'ओला-ऊबर के कारण ऑटो सेक्टर में मंदी' - क्या निर्मला सीतारमण के इस बयान से आप सहमत है ?

हाँ
  20.75%
नहीं
  69.81%
कुछ कह नहीं सकते
  9.43%

TOTAL RESPONSES : 53

Raise Your Voice
Raise Your Voice 

Suffering From Problem In Your Area ? Now Its Time To Raise Your Voice And Make Everyone Know