विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात भाजपची रथयात्रा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रथयात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी केली आहे. 'फिर एक बार, शिवशाही सरकार' आणि 'अब की बार, २२० के पार' अशी घोषवाक्यं घेऊन ही रथयात्रा निघेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार असल्याने सगळेच पक्ष तयारीला लागेल आहेत. सत्ताधारी भाजपनेही निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली असून आज भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी रथयात्रेचा संकल्प सोडला. 

ही रथयात्रा ऑगस्ट महिन्यात काढण्यात येईल. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात रथयात्रा जाईल, असे नमूद करताना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याचा आमचा संकल्प असून राज्यात पुन्हा एकदा शिवशाही सरकार आणायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

More videos

See All