मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १० किलोमीटरचा नवीन बोगदा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात आणि वाहतूक कोंडीच्या घटना टाळण्यासाठी खालापूर येथून १० किलोमीटरचा बोगदा करण्यात येणार आहे. सात हजार कोटींच्या या कामांतून अध्र्या तासाचे अंतर कमी होऊन वाहनधारकांच्या वेळ, इंधनाची बचत होईल, असे नमूद करत सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी या मार्गावर नव्याने टोल वसुलीचे एकप्रकारे समर्थन केले.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे टोल वसुलीचे कंत्राट ऑगस्ट २०१९ मध्ये पूर्ण होत आहे. द्रुतगती मार्गावरील टोल वसुलीची मुदत संपुष्टात येत असताना पुन्हा त्याच मार्गावर नव्याने टोल वसुलीच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याबाबत जाहिरात दिली आहे. नव्याने टोल वसुलीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नावर शिंदे यांनी द्रुतगती मार्गावरील प्रस्तावित कामाची माहिती दिली. द्रुतगती मार्गाची उभारणी झाल्यामुळे विकासाला गती मिळाली. मार्गावरील काही विशिष्ट भाग अपघातप्रवण असून तिथे वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. 

More videos

See All