प्रत्येक युवकापर्यंत काँग्रेसचे विचार पोहोचवा : कुणाल राऊत - प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक प्रचारानिमित्त राऊत यांचे भंडारा येथे जल्लोषात स्वागत

भंडारा: एकीकडे वाढलेली महागाई आणि दुसरीकडे बेरोजगारी यामुळे देशभरातील युवा वर्गात आक्रोश आहे. मात्र केंद्र सरकार विरोधात बोललो तर भाजपच्या आयटी सेल कडून ट्रोल करण्यात येते. यामुळे युवा वर्ग व्यक्त होत नाही. त्यांच्या मनातील भिती दूर करा, त्यांच्या पाठीशी उभे रहा. त्यांना साथ द्या, त्याच्यापर्यंत कांग्रेसचे विचार पोहोचवा असे आवाहन प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले.
 प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपद निवडणुक प्रचारानिमित्त त्यांनी आज भंडारा जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी भंडारा व तुमसर या शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भंडारा जिल्ह्यात प्रवेश करताच नागपूर नाका येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.
या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या भेटी देखिल त्यांनी घेतल्या.
माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या अनेक कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली.
" युवक काँग्रेसचे विचार अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचवा आणि मोठ्या संख्येने त्यांना युवक काँग्रेसचे सदस्य करा," असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव शिशिर वंजारी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर , काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे भंडारा शहर अध्यक्ष रिजवान काझी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसेच प्रदेश युवक काँग्रेस निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर नाशिक नगर येथील मैत्रेय बुद्ध विहार येथे भगवान बुद्ध यांना वंदन केले. जिल्ह्यात विविध ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांच्या भेटी त्यांनी घेतल्या.
यावेळी अनुसूचित जाती कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने  महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष मंजुषा चव्हाण,शहर अध्यक्ष सारिका नागदेवे आणि उपाध्यक्ष रजनी खोब्रागडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आवेश पटेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस झिया पटेल, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजकपूर राऊत, इरफान पटेल, कमल साठवणे, विनीत देशपांडे, आकाश ठवकर, राकेश निर्वाण, भंडारा विधान सभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सचिन फाले, शहर युवक काँग्रेस शहर अध्यक्ष शाहीन मून, महासचिव साहिल मेश्राम, राकेश तांडेकर, चांद डोंगरे, निलेश वैरागडे, निखिल आगलावे, अमन वाघमारे, समीर भुरे, शाहिद शेख यांच्यासह आदींची उपस्थितीती होती.