संविधानाचे रक्षण युवाशक्तीचे कर्तव्य! - कुणाल राऊत
२६ नोव्हेंबर हा दिवस "संविधान दिवस" म्हणून साजरा करतात. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होऊन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे घटना समितीने हे संविधान स्वीकारले. संसदेत या दिवशी संविधानाला मान्यता देण्यात आली. जगात सर्वात मोठे लिखित संविधान बनविण्यासाठी भारतातील सर्वोत्तम नेते मंडळी दोन वर्षे ११ महिने आणि अठरा दिवस या दीर्घ काळात कार्य करीत होते. एकूण २९९ सदस्य असणाऱ्या संविधान सभेत संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, केंद्रीय अधिकार समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू, प्रांतिक संविधान समिती तसेच मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सरदार पटेल आणि एकमेवाद्वितीय असे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीत मोलाचे योगदान आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना प्रदान केली. हाच तो दिवस "संविधान दिवस" म्हणून आपण साजरा करतो.
संविधान म्हणजे मूलभूत कायदा, राजकीय व्यवस्थेची रचना, रचनेचे कार्य देशातील नागरिक, त्यांचे अधिकार, ह्या अधिकाराच्या व्याप्ती आणि इतर उपाययोजना, शासनव्यवस्था ई. गोष्टी विस्तृतपणे यात मांडण्यात आल्या आहेत. संविधानाने आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली आजही या संविधानाने जगात भारतीयत्व आणि लोकशाहीचा तिरंगा फडकवत ठेवला आहे. फाळणीने दुरावलेले आपले बंधू हुकुमशाही आणि लष्करी सत्तेत असताना भारत संविधानामुळे लोकशाही व्यवस्थेत ताठ मानेने मार्गक्रमण करत आहे. संविधानने स्वीकारलेली लोकशाही भारतीय समाजमनाने आपल्या जीवनाचा एक भाग बनविली आहे. भारताबरोबर स्वातंत्र्य मिळालेल्या आशिया, अफ्रिकेतील अनेक देशांना लोकशाही आणि संविधान टिकवून ठेवता आले नाही. मात्र भारत, आजचा १३५ कोटींचा भारत “We THE PEOPLE" चा नारा देत लोकशाही वर्धिष्णू करीत आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढला गेला. या लढ्यातील विचारातून चिंतनातूनच राज्यघटनेचा पाया रचला गेला. त्यामुळे काँग्रेसचा विचार म्हणजे संविधानाचा विचार आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. संविधानावर हल्ला करून त्याला संपविण्याचे संघ परिवार आणि भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. संविधानाची निर्मिती करणाऱ्या काँग्रेस पक्षाला म्हणूनच लक्ष्य केले जात आहे!
या पार्श्वभूमीवर संविधानाच्या रक्षणासाठी युवा पिढीला संघटित करण्यासाठी आणि या लढ्याचे काँग्रेसला मजबुतीने करता यावे म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. संविधानाचे भवितव्य
देशातील तरुणाईच्या संवेदनशीलता, सनदशीर मार्गांचा अवलंब करण्याची वृत्ती आणि जागरूकता यावर अवलंबून आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
आज आपण भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे म्हणतो. कारण न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, देशाची एकता, अखंडता, मानवकल्याण वैज्ञानिक दृष्टीकोन हे आधुनिक भारत घडविण्याचे बीज घटनाकारांनी भारतीय घटनेत अनुस्यूत केले होते. जो खंडप्राय देश शेकडो राजवटी, धार्मिक रुढी, परंपरा, कुपोषण, गरिबी, अशिक्षितपणा, अनारोग्य भेदभाव यात अडकून होता, तो देश २६ जानेवारी १९५० ला संविधान हाती घेऊन जगाला सर्वसमावेशकतेने अहिंसामय पद्धतीने कसे जगावे याचा धडा देत आहे.
१९४७ ला या देशात मानवी आयुमर्यादा ३१-३२ वर्षाची होती, ती आज ६९ वर्षे इतकी झाली आहे. हे संविधानाच्या यशस्वीतेचे एक प्रमाण आहे. अजूनही आपल्याला खूप पुढे जायचे आहे मात्र गेल्या ७० वर्षात जी प्रगती आपण साधू शकलो त्यात आपल्या संविधान कर्त्यांचा मोठा वाटा आहे.
मी तरुणांचे प्रतिनिधीत्व करतो आहे. आज २०२१ मध्ये भारतीयांचे सरासरी वय २८.४ वर्षे आहे. म्हणून भारत ही जगाची तरुणाईची राजधानी आहे. जग बदलविणारे तरुणच असतात. जगातले प्रश्न तरुणांच्या हातून सोडविण्यासाठी थांबलेले असतात. तरुणाईला उज्ज्वल भविष्याची आणि सुरक्षित जीवनाची हमी देशाचे संविधान देते. त्यामुळे तरुणाईसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे संविधान, त्यातील शक्तीस्थळे समजून घेण्याची गरज आहे. संविधान कोलमडले तर देशात अराजक माजेल आणि यात लाखो तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी होईल,हे आपण लक्षात ठेवायला हवे.
भारत संविधानाच्या तरतुदींप्रमाणे विकासाची यात्रा शेवटच्या माणसापर्यंत नेऊ शकला तर भारत बलशाली होईलच पण बुद्धाचा भारत जगात शांती आणि अहिंसेचे महात्मा गांधीचे स्वप्न प्रत्यक्षात आणेल.
महात्मा गांधी, नेहरू, डॉ. आंबेडकर यांच्या स्वप्नाचा विविधतेत एकतेने नटलेला देश मानवी मूल्यांना प्राधान्य देऊन घडविण्याची २६ नोव्हेंबर २०२१ रोजी शपथ घेऊया आणि प्रजासत्ताक भारताच्या उज्जवल भविष्याची कामना करुया.