'नुसतीच सांगायला छप्पन इंचाची छाती; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जनतेची वाटते भीती'
Latest News
bookmarkBOOKMARK

'नुसतीच सांगायला छप्पन इंचाची छाती; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जनतेची वाटते भीती'

By Lokmat calender  25-Aug-2019

'नुसतीच सांगायला छप्पन इंचाची छाती; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जनतेची वाटते भीती'

 विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा काळ शिल्लक राहिला असताना सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आतापासूनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रा आज गेवराईत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री यांना रस्त्यावर फिरायची भीती वाटते. त्यामुळे का नाही आम्ही म्हणायचं 'नुसतीच सांगायला दिल्लीत छप्पन इंचाची छाती आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरताना जनतेची वाटते भीती' अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्यावर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज गेवराईत असताना कोल्हे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाना साधला. भाजपची महाजनादेश यात्रा धुळ्यात असताना, मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या पत्नीला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री यांना रस्त्यावर फिरायाची भीती वाटत आहे. 'निसतच सांगायला दिल्लीत छप्पन इंचची छाती आणि महाराष्ट्राच्या मुख्यामंत्र्यांना रस्तावर फिरताना जनतेची वाटते भीती' असे आम्ही म्हणालो तर चुकीच काय ? अशा शब्दात त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

MOLITICS SURVEY

क्या संतोष गंगवार के बयान का असर महाराष्ट्र चुनाव में होगा ?

हाँ
  50%
नहीं
  50%
पता नहीं
  0%

TOTAL RESPONSES : 2

Raise Your Voice
Raise Your Voice 

Suffering From Problem In Your Area ? Now Its Time To Raise Your Voice And Make Everyone Know