राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक
Latest News
bookmarkBOOKMARK

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक

By Maharashtratimes calender  06-Aug-2019

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक

माजी मंत्री सचिन अहिर यांच्या पक्षांतरामुळं रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी पक्षाचे प्रवक्ते व माजी मंत्री नवाब मलिकयांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. कुर्ला-अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेले नवाब मलिक हे सध्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. माध्यमांतून ते पक्षाची बाजू अतिशय समर्थपणे मांडत असतात. यापूर्वी त्यांनी पक्षाच्या मुंबई शाखेचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. उत्तर भारतीय असूनही मराठी भाषेवर त्यांची चांगली पकड आहे. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना पक्षाशी जोडून घेण्यास त्यांची मदत होऊ शकते, असा पक्षाचा होरा आहे. 

MOLITICS SURVEY

'ओला-ऊबर के कारण ऑटो सेक्टर में मंदी' - क्या निर्मला सीतारमण के इस बयान से आप सहमत है ?

TOTAL RESPONSES : 48

Raise Your Voice
Raise Your Voice 

Suffering From Problem In Your Area ? Now Its Time To Raise Your Voice And Make Everyone Know