केजरीवालांसोबत जे घडतंय, ते लोकशाहीसाठी धोकादायक- शिवसेना

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ठिय्या आंदोलनाला अनेक बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेसनं मात्र केजरीवाल यांच्या आंदोलनापासून चार हात लांब राहणं पसंत केलं आहे. केजरीवालांच्या या आंदोलनाला आता भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केजरीवाल यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. 

अरविंद केजरीवाल यांनी सुरु केलेलं आंदोलन अतिशय वेगळं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केजरीवालांसोबत चर्चा केली आहे. दिल्लीच्या जनतेनं केजरीवालांना निवडून दिलं आहे. दिल्लीसाठी काम करण्याचा अधिकार त्यांना जनतेनं दिला आहे. सरकार लोकशाहीनं निवडून आलं असल्यामुळे त्यांच्यासोबत जे घडतं आहे, ते लोकशाहीसाठी चांगलं नाही,' असं राऊत म्हणाले. 

शिवसेनेच्या आधी चार मुख्यमंत्र्यांनी केजरीवालांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा समावेश आहे. काँग्रेसनं मात्र या सर्वापासून चार हात दूर राहणं पसंत केलं आहे. 

More videos

See All