कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर अनंतात विलिन, शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप

महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर शासकीय इतमामात शुक्रवारी, १ जूनरोजी शेगाव रोडवरील सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी भाऊसाहेब फुंडकर यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानावरून सकाळी ८ वाजता निघाली. टाळ मृदंगाच्या गजरात अटाळी येथील वारकरी यात सहभागी झाले होते. भाजप कार्यालय, गांधी बगीचा, कमानी गेट, एकबोटे चौक, भगतसिंग चौक, फरशी, मेन रोड, टिळक पुतळा, चांदमारी, शेगाव नाका, शेगाव रोडने मार्गक्रमण करीत सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या प्रांगणामध्ये सकाळी ११.३० वाजता अंत्ययात्रा पोहचली.

More videos

See All