चंद्रकांत गुडेवार यांच्यावर हक्कभंगाची कारवाई


अमरावतीचे तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवर यांना विधानसभेसमोर बोलवून समज देण्यात आली.
चंद्रकांत गुडेवार यांना आज विधानसभेच्या न्यायालयासमोर हजर करून समज देण्यात आली. आमदार सुनील देशमुख यांनी गुडेवार यांच्याविरोधात हक्कभंग मांडला होता.
जुलैच्या पावसाळी अधिवेशनात हक्कभंग समितीने शिक्षेबाबत निर्णय दिला होता. गुडेवार अमरावती महापालिकेत आयुक्त असताना त्यांनी सुनील देशमुख यांना डावलून पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींची यादी जाहीर केली होती.
सुनील देशमुख यांनी याबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर गुडेवार यांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन देशमुख यांचा दावा खोडून काढला होता. त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींची जनमानसात प्रतिमा मलिन केल्याचा विधानसभेचा ठपका ठेवण्यात आला होता. 


More videos

See All