राज्‍यात प्रत्‍येक एसटीडेपोमध्‍ये मराठी पुस्‍तकाच्‍या दुकानासाठी जागा उपलब्‍ध करून द्या - आशिष शेलार

राज्‍यात मराठी पुस्‍तकांचा प्रसार आणि प्रचार व्‍हावा म्‍हणून राज्‍यातील एसटी डेपोमध्‍ये मराठी पुस्‍तकाच्‍या स्‍टॉलला जागा देण्‍यात यावी, अशी मागणी करतानाच हज यात्रेवर आकारण्‍यात येणारा 18 टक्‍के जीएसटी रद्द करण्‍यात यावा व मुंबई विद्यापीठात उर्दु भाषा भवन उभारण्‍याची मागणी आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. विधानसभेत आज मराठी भाषा विभाग व अल्‍पसंख्‍याक विभागाच्‍या मागण्‍यांवर चर्चा करताना मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज या दोन्‍ही विभागातील महत्‍वाच्‍या मागण्‍यांकडे लक्ष वेधले.
राज्‍यात भाजपाचे सरकार आल्‍यानंतर मराठी भाषेसाठी अनेक नवनविन उपक्रम राबविले जात आहेत. त्‍याबद्दल  सरकारचे अभिनंदन करतानाच पुस्‍तकाचे दुसरे गाव गणपती पुळे जवळील कवी केशवसुतांचे  गाव असणा-या माळगुंड येथे उभारण्‍यात यावे अशी आग्रही मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. तसेच महाराष्‍ट्रात मराठी ललित साहित्‍याची केवळ 55 दुकाने असून त्‍यातील बहूतांश दुकाने पुणे आणि मुंबईत आहेत. अनेक जिल्‍हयांमध्‍ये पुस्‍तकाचे दुकान नाही त्‍यामुळे सर्व एसटीडेपो मध्‍ये मराठी पुस्‍तकांच्‍या स्‍टॉलसाठी 250 ते 500 चौ. फुटाच्‍या स्‍टॉलसाठी जागा उपलब्‍ध करून देण्‍यात यावी अशी मागणी त्‍यांनी केली.
तर शासनाने सुरू केलेल्‍या ग्रंथ प्रदर्शनाला सध्‍या शासकीय स्‍वरूप आले आहे. त्‍यामध्‍ये बदल करण्‍याची गरज असून या उपक्रमला अधिक चांगला प्रतिसाद मिळावा म्‍हणून शासनाने विशेष प्रयत्‍न करून ही एक चळवळ म्‍हणून राज्‍यात वाढेल यासाठी प्रयत्‍न करावेत.  तसेच अक्षरधारा सारख्‍या संस्‍था ग्रंथ प्रदर्शनांची संख्‍या कमी झाली असून त्‍यांना शासकीय जागा सवलतीमध्‍ये उपलब्‍ध करून देणे सारखे उपाय करण्‍याची गरज आहे तर आघाडी सरकारने प्रत्‍येक महापालिका क्षेत्रात पुस्‍तकाच्‍या दुकानासाठी काही गाळे राखीव ठेवण्‍याची घोषणा झाली खरी पण पुढे काहीच झाले नाही. अशा प्रकारचे गाळे भाजपा सरकारने उपलब्‍ध करून द्यावे अशी मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली.

More videos

See All