आमदार सीमा हिरे यांच्या अंगरक्षकाची तरुणांना मारहाण
Latest News
bookmarkBOOKMARK

आमदार सीमा हिरे यांच्या अंगरक्षकाची तरुणांना मारहाण

By Lokmat calender  24-Feb-2018

आमदार सीमा हिरे यांच्या अंगरक्षकाची तरुणांना मारहाण

नाशिक येथील भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्या मोटारीला कसाºयाजवळ दुस-या मोटारीने धडक दिली. यावेळी झालेल्या बाचाबाचीत हिरे यांच्या अंगरक्षकाने काही तरुणांना मारहाण केल्यानंतर ग्रामस्थ धावून आल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथे परस्परांची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.  आमदार हिरे या शुक्रवारी सकाळी नाशिकहून मुंबईकडे निघाल्या होत्या.
कसा-याजवळ एका मोटारीने धडक दिल्यामुळे हिरे यांची मोटार बाजूला फेकली गेली. त्यांच्या सोबत त्यांची मुलगी आणि त्यांचा अंगरक्षक ओव्हळ होता. अपघातानंतर धडक दिलेल्या मोटारीचा चालक व त्यातील चार तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना हिरे यांचा मोटार चालक तसेच अंगरक्षकाने पाठलाग करु न त्यांना पकडले. त्यावेळी बाचाबाची व हाणामारी झाली.  ग्रामस्थ जमल्यानंतर प्रकरण कसारा पोलीस ठाण्यात गेले. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी कारवाईची मागणी केली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दोघांची समजूत घातली. त्यानंतर एकमेकांची माफी मागून प्रकरण मिटवण्यात आले.

नाशिकहून मुंबईला जात असताना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पाठीमागून आलेल्या एका मोटारीने आमच्या गाडीला धडक दिली आणि नंतर ते पळून गेले. त्यामुळे आम्ही त्या गाडीचा पाठलाग करून त्यांना अडवले. अपघात करून पळून जाणे हे चुकीचे असल्याने त्यांना विचारणा करण्यासाठी अडवले तेव्हा त्या मोटारीतील दहा ते बारा स्थानिक युवकांनी थेट क्रिकेटची बॅट वैगरे साहित्य घेऊन मारण्यासाठी धावले. त्यामुळे त्यांच्याशी बॉडीगार्डची झटापट झाली. हे युवक स्थानिक असल्याने त्यांनी ग्रामस्थांना बोलविल्यानंतर वाद पोलीस ठाण्यात गेला.

MOLITICS SURVEY

मॉब लिंचिंग किस वजह से हो रही है ?

दाढ़ी
  5.66%
टोपी
  9.43%
राष्ट्रवाद
  84.91%

TOTAL RESPONSES : 53

Raise Your Voice
Raise Your Voice 

Suffering From Problem In Your Area ? Now Its Time To Raise Your Voice And Make Everyone Know