फडणवीस हे महाराष्ट्राला मिळालेले ‘गॉड गिफ्ट’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला मिळालेले गॉड गिफ्ट आहे. त्यांची इच्छा असेपर्यंत, तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी येथे व्यक्त करून, मुख्यमंत्री पदावरून युतीमध्ये सुरू असलेल्या वादाला पुन्हा फोडणी दिली. महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभा ठाणे विभाग आणि कल्याण तेली समाज यांच्या विद्यमाने मंगेशी सभागृहामध्ये समाजाच्या कार्यक्रमात उर्जा मंत्री बावनकुळे यांना सन्मानित केले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बावनकुळे यांनी माझ्यासारखे एक हजार कार्यकर्ते तयार झाले, तरी फडणवीस यांच्या इतक्या ताकदीचे काम करता येऊ शकत नाही. राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार असून, फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

More videos

See All