मजुरीच्या पैशातील १०१ रुपये मनिऑर्डर करून मुख्यमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्म दिन. समाजातील शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध असलेल्या मुख्यमंत्र्यांना जन्म दिनानिमित्ताने याच शेवटच्या घटकाकडून आज एक वैशिष्ट्यपूर्ण आणि भावस्पर्शी भेट प्राप्त झाली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात आलेल्या मदतीमुळे कॅन्सरग्रस्त बालकाला जीवनदान मिळाल्याने मोलमजुरी करणाऱ्या पालकांनी कृतज्ञभावनेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 101 रुपयांची मदत पाठविली.
औरंगाबाद जिल्ह्यातील कनकोरी (ता.गंगापूर) येथील वेदांत भागवत पवार हा पाच वर्षीय बालक पित्ताशयाच्या कर्करोगाने पिडीत होता. वेदांतचे वडील वाळूज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात तर आई शेतात मजुरी करते. अशा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या बालकाच्या उपचाराचा खर्च पालकांना पेलवणे शक्य नव्हते. त्याच्या पालकांसह नातेवाईकांनी आपल्यापरीने मदत करून त्यावर उपचार सुरु केले. मात्र, या उपचाराचा मोठा खर्च भागविणे अडचणीचे ठरू लागले. पालकांची सारी पुंजी त्यासाठी खर्ची पडली. त्यामुळे पवार कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. या बालकाची आत्या श्रीमती रेणुका सुनील गोंधळी या नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता.नेवासा) येथे राहतात. 

More videos

See All